केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. महिनाभरावर आलेल्या दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ११ लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. Union Minister Prakash Javadekar: For 11 lakh railway employees, this govt has consistently for last 6 years, being giving record bonus, equivalent to the wage of 78 days. This year also, 11,52,000 employees will get 78 days wage as bonus. This is the reward for productivity. pic.twitter.com/XnDpz2uHfc — ANI (@ANI) September 18, 2019 दिवाळीला अजून एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना रेल्वे मंत्रालयाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे. याचा फायदा रेल्वेच्या ११ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. सलग सहाव्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले. दरम्यान, या महत्वाच्या निर्णयाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवरही बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "ई-सिगारेटचा वापर, उत्पादन, विक्री तसेच साठवणूक करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे." Preeti Sudan, Secretary Health and Family Welfare: The punishment proposed is imprisonment up to 1 year or a fine of up to Rs. 1 lakh, or both for the first offence&imprisonment of 3 years or a fine up to Rs. 5 lakhs or both, for subsequent offence. E-hookahs are also included. pic.twitter.com/YZqKow7Td8— ANI (@ANI) September 18, 2019 ई-सिगारेट आणि ई-हुक्का बंदीबाबत माहिती देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले की, "जर या नियमाचे उल्लंघन झाले तर त्यासाठी कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच जर हा गुन्हा घडला असेल तर त्यासाठी १ वर्षाचा तुरुंगवास किंवा १ लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. तसेच वारंवार जर या नियमाचे उल्लंघन झाले तर तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाखांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल.