03 March 2021

News Flash

‘मोदी सरकारला धडा शिकवणार’; डीएमकेच्या अध्यक्षपदी विराजमान होताच स्टालिन गरजले

पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. या पहिल्याच भाषणात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

डीएमकेचे नेते एम. के. स्टालिन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एम. करुणानिधी यांच्यानंतर ते पक्षाचे दुसरे अध्यक्ष बनले आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. या पहिल्याच भाषणात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच मोदी सरकारला धडा शिकवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

स्टालिन म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक संस्थांची वाट लावली आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी मोदी सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन केले. आजची राजकीय स्थिती खूपच आव्हानात्मक आहे. शिक्षण, कला, साहित्य आणि धर्मावर जातीयवादी शक्तींकडून हल्ले होत आहेत. केंद्र सरकार न्यायव्यवस्था आणि राज्यपालांच्या नियुक्त्या अस्थिर करु पाहत आहे. यामुळे आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या साच्याला मोठे नुकसान पोहोचवले आहे. त्यामुळे यापुढे खपवून घ्यायचे नाही, मोदी सरकारला आता धडा शिकवायचा असे आवाहन स्टालिन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, द्रमुकच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी एम. के. स्टालिन यांची बिनविरोध निवड करण्यात आल्यानंतर या प्रसंगी पक्षाचे दिवंगत माजी अध्यक्ष करुणानिधी यांना भारतरत्न देण्याची मागणीही करण्यात आली.

करुणानिधी ह्यात असतानाच त्यांचे पुत्र स्टालिन आणि अळगिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. अळगिरी यांची २०१४ मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. द्रमुक म्हणजे काही मठ नाही की जेथे धर्मगुरु त्याचा उत्तराधिकारी जाहीर करेल, असे विधान त्यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 5:12 pm

Web Title: dmk chief mk stalin urges to workers to fight against modi govt
Next Stories
1 पत्नीच्या हत्येप्रकरणी अनिवासी भारतीयाला २८ वर्षांचा तुरुंगवास
2 Kerala Floods : राहुल गांधींनी स्वतःचे हेलिकॉप्टर थांबवले; एअर अॅम्ब्युलन्सला दिले प्राधान्य
3 अल्पवयीन मद्यपी मुलांना गोव्यात साफसफाईची शिक्षा
Just Now!
X