18 September 2020

News Flash

डीएमके अध्यक्ष करुणानिधी रुग्णालयात

प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

करुणानिधी (संग्रहित छायाचित्र)

डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना आज, बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिसेंबरमध्ये लावण्यात आलेली ‘फीडिंग ट्यूब’ बदलण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना संध्याकाळपर्यंत सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक एस. एस. अरविंदन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

डिसेंबरमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ‘ट्रेकिआटमी’ करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल करताना त्यांची पत्नी राजति अम्मल, मुलगी आणि खासदार कनिमोळी, मोठी मुलगी सेल्व्ही आणि डीएमकेचे नेते पोनमुडी, विरोधी पक्षनेते एम. दुरुमुरुग्नन आदी उपस्थित होते. त्यांचे पूत्र आणि डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन लंडन दौऱ्यावर गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 10:28 am

Web Title: dmk president karunanidhi admitted to hospital in chennai
Next Stories
1 योगी सरकारने गोरखपूर दुर्घटनेसाठी प्रायश्चित घ्यावे; संघाचा दबाव
2 टेरर फंडिंग: श्रीनगर, बारामुल्ला, हंदवाड्यात १२ ठिकाणी ‘एनआयए’चे छापे
3 विमान उतरवताना लेझरमुळे पायलट गोंधळला!; सुरक्षा यंत्रणांची धावाधाव
Just Now!
X