करोनाचा धोका वाढत असल्याने देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हे तुमच्या सुरक्षेसाठी असून या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका, कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. ‘Minding our minds during the COVID-19 pandemic’ नावाची एक पुस्तिका सरकारने ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे, यामधून हे आवाहन करण्यात आलं आहे.

यात म्हटलंय की, “नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा. यासाठी आवडतं संगीत ऐका, पुस्तकं वाचा, टिव्हीवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघा. त्याचबरोबर पेंटिग्ज बनवणे, बागकाम करणे किंवा कपडे शिवणे असे तुमचे जुने छंद असतील तर पुन्हा ते सुरु करा. याद्वारे मागे पडलेल्या तुमच्या छंदांचा पुन्हा एकदा शोध घ्या”

Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

या पुस्तिकमध्ये अशा काही टिप्स दिल्या आहेत. ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंगमुळे चिंता आणि ताण निर्माण होत असल्यास त्यावर कशी मात करावी याबाबत सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, जे करोनानेग्रस्त आहेत त्यांच्याबाबत आपलं चुकीचं मत बनवू नका असं आवाहन या पुस्तिकेतून करण्यात आलं आहे. कारण, असा रुग्ण या आजारातून जरी बरा झाला असला तरी इतरांच्या वागणुकीमुळे त्याच्या मनावर ताण येऊ शकतो.

जर तुम्हाला स्वतःला करोनाची लागण झाली असेल तर घाबरुन जाऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या की, मोठ्या प्रमाणावर लोक यातून बरे होत आहेत. मात्र, यावर डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये टाकून घ्या.

आयसोलेशनमध्ये असताना एकटं वाटणं किंवा वाईट वाटणं ही सामान्य बाब आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंब आणि मित्र परिवारासोबत कनेक्टेड रहा. बऱ्याच काळापासून ज्यांच्याशी तुमचा संवाद झालेला नाही त्यांना फोन करुन आश्चर्याचा धक्का द्या. अशा प्रकारे संवाद साधताना आपले आनंदी क्षण, सामायिक आवडीच्या गोष्टी, जेवण बनवण्याच्या टिप्स किंवा संगीताचं आदान-प्रदान करा, असंही यात म्हटलं आहे.

जर तुम्हाला एकटं वाटत असताना खूपच नकोसं वाटत असेल काहीवेळा हे जीवनच नको अशी भावना मनात उत्पन्न होत असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि सल्ला घ्या.