News Flash

जयंती विशेष : असे आहे स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारीतील स्मारक

विवेकानंदांचे स्मारक हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे

विवेकानंद रॉक मेमोरियल हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहारातल वसलेलं एक प्रसिद्ध स्थळ आहे. १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीमध्ये आले होते. एक दिवस पोहत जाऊन ते विशाल शिळेवर बसले. या ठिकाणी बसून त्यांनी ध्यानधारणा केली. ज्या ध्यानधारणेनंतर आयुष्यातल्या लक्ष्यप्राप्तीचा मार्ग त्यांना सापडला. आज तेच ठिकाण विवेकानंद रॉक मेमोरियल या नावाने ओळखलं जातं. विवेकानंदाचं एक सुंदर मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं आहे. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त अनेक लोक या ठिकाणी येत असतात. १२ जानेवारी हा विवेकानंदांच्या जयंतीचा दिवस. यानिमित्ताने आपण जाणून घेऊया स्वामी विवेकानंद यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला. १८९३ मध्ये एका धर्म सभेत सहभागी होण्यासाठी स्वामी विवेकानंद कन्याकुमारी या ठिकाणी आले होते. एक दिवस पोहत जाऊन ते कन्याकुमारी येथील शिळेवर पोहचले. या ठिकाणी असलेली नीरव शांतता त्यांना भावली. या शांततेतूनच त्यांना आयुष्याची दिशा मिळाली असं म्हटलं जातं.

स्वामी विवेकानंद यांच्या संदेशाला आकार देण्याच्या दृष्टीने कन्याकुमारी येथील विशाल शिळेवर एका भव्य स्मृती मंदिराची निर्मिती करण्यात आली. फक्त भारतातलेच नाही तर जगभरातले लोक या स्मृती मंदिराला भेट देतात. या ठिकाणी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच क्षितिजावर दिसतात. या स्मृतीमंदिराचं प्रवेशद्वार अजिंठा वेरुळ येथील लेण्यांप्रमाणे आहे. तर मंदिराचा सभामंडप हा कर्नाटकातील बेलूर या ठिकाणी असलेल्या रामकृष्ण मंदिरासारखा आहे.

या स्मृती मंदिरात चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या चौथऱ्यावर स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे. हा पुतळा ब्राँझने घडवण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची साडेआठ फूट आहे. स्वामी विवेकानंद यांचा हा पुतळा पाहणाऱ्यावर एक वेगळाच प्रभाव पाडतो.

जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक अगदीच खास आहे. जगभरातले पर्यटक या स्मारकाला भेट देत असतात. हे स्मारक स्थापत्यकलेचाही उत्तम नमुना असलेले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 7:33 am

Web Title: do you know intresting facts about vivekananda rock memorial scj 81
Next Stories
1 मुलांचे पोट भरण्यासाठी आईने १५० रुपयांना विकले स्वत:चे केस
2 एलियन्स आहेत का? “होय! कदाचित पृथ्वीवरच आहेत; फक्त…”
3 कला टिकवण्यासाठी ‘हा’ चित्रकार झाला डिलिव्हरी बॉय
Just Now!
X