गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे गोव्यात निधन झाले. गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. त्यांच्या पत्नीचे निधनही कर्करोगानेच झाले होते अशीही माहिती समोर आली आहे. २००१ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचे निधन कर्करोगानेच झाले.

दरम्यान गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर हे त्यांच्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर अमेरिकेत आणि भारतात उपचार घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर घरी आणि गोव्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. आपल्या साधेपणासाठी मनोहर पर्रिकर ओळखले जात. २००० मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते स्कूटरवरून फिरत असत. गोव्यात अनेकदा लोकांना रांगेत भेटत. आपल्या साधेपणासाठी ते प्रसिद्ध होते.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या

भाजपात त्यांनी मुख्यमंत्रीपद ते देशाचं संरक्षण मंत्री पद अशी कारकीर्द भुषवली. कर्करोगाने त्यांना ग्रासले होते तरीही त्याही अवस्थेत त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवली. गोवा विधानसभेत उपचाराच्या स्थितीत आलेले पर्रिकर अवघ्या देशानेच पाहिले आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाला ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यातही अडचणी येत होत्या. अखेर रविवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे निधन जसे कर्करोगाने झाले तसेच त्यांच्या पत्नीचेही निधन कर्करोगानेच झाले होते. विचित्र योगायोग म्हणावा अशीच काहीशी ही घटना आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गोव्यावर शोककळा पसरली आहे.