News Flash

५० हत्या केल्यानंतर पुढची संख्या विसरलो, डॉक्टरची कबुली ऐकून पोलिसही चक्रावले

पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपी डॉक्टरला अटक

दिल्ली तसंच आसपासच्या परिसरात ५० हून अधिक हत्या करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरला राजधानीत बुधवारी अटक करण्यात आली. जानेवारी महिन्यात पॅरोलवर सुटल्यानंतर डॉक्टर फरार झाला होता. डॉक्टर १०० हून अधिक हत्यांमध्ये सहभागी असल्याची पोलिसांना शंका आहे. मात्र नेमकी संख्या अद्याप हाती आलेली नाही. डॉक्टरविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये गुन्हे दाखल असून पोलीस या सर्व गुन्ह्यांची माहिती घेत आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे,

देवेंद्र शर्मा असं या ६२ वर्षीय आरोपी डॉक्टरचं नाव आहे. देवेंद्र शर्मा हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. अपहरण तसंच हत्येच्या अनेक गुन्ह्यांमध्ये देवेंद्र शर्मा आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याआधी उत्तर प्रदेशात बनावट गॅस एजन्सी चालवत असल्याबद्दल त्याला दोनदा तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये किडनी रॅकेट चालवत असल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती.
धक्कादायक म्हणजे देवेंद्र शर्मा याने पोलिसांना ५० हत्येनंतर नंबर लक्षात ठेवणं कठीण जात असल्याने नेमक्या किती हत्या केल्या सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे. पोलीस त्याची चौकशी करुन अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

“हत्येप्रकरणी देवेंद्र शर्मा जयपूरमधील सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. १६ वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर २० दिवसांच्या पॅरोलवर तो बाहेर आला होता. पण तो फरार झाला आणि आपल्या गावी जाऊन राहू लागला. त्यानंतर त्याने मार्च महिन्यात दिल्ली गाठली,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. एका विधवा महिलेशी लग्न करुन देवेंद्र शर्मा लपला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याच्या इच्छेने दिल्लीत आला होता. आपल्या दूरच्या नातेवाईकाशी लग्न करुन तो नवीन ओळख निर्माण करु इच्छित होता. त्याने नवीन व्यवसायही सुरु केला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी मंगळवारी सुरु केलेली चौकशी दुसऱ्या दिवसापर्यंत सुरु होती. पोलिसांनी देवेंद्र शर्मा सहकार्य करत असून अत्यंत शांत असल्याचं म्हटलं आहे. तपासादरम्यान ५० हत्येमागे आपण असल्याची कबुली त्याने दिली आहे. २००२ ते २००४ मध्ये त्याने या सर्व हत्या केल्या होत्या. पण सातच हत्यांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:46 pm

Web Title: doctor arrested in delhi says lost count after 50 murders sgy 87
Next Stories
1 दिल्लीच्या जनतेला केजरीवाल सरकारचा मोठा दिलासा, प्रतिलिटर डिझेल आठ रुपयांनी स्वस्त
2 धक्कादायक! अमेरिकेत हॉस्पिटलबाहेर भारतीय नर्सची हत्या, नवऱ्याने तीक्ष्ण हत्याराने केले वार
3 रिलायन्सचं मुख्यालय बँक घेणार ताब्यात; २९०० कोटींच्या कर्जप्रकरणी अनिल अंबानींना दणका
Just Now!
X