26 September 2020

News Flash

पोटदुखीवर कंडोम वापरण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर सरकारने केली कारवाई

पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या महिला रुग्णाला दिला होता कंडोम वापरण्याचा सल्ला

संग्रहित

झारखंडमधील घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरने पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या महिला रुग्णाला कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. जुलै महिन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर चौकशीअंती या डॉक्टरला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. बहरागोडा येथील झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम पक्षाचे आमदार कुणाल सारंगी यांनी हे प्रकरण विधासनभेमध्ये मांडल्यानंतर यावरुन चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. अखेर दोन महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाई केल्याबद्दल सारंगी यांनी मुख्यमंत्री रघुवर दास आणि राज्याचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी आणि विरोधी पक्ष नेते हेमंत सोरेन यांचे आभार मानले आहेत.

काय घडले होते

घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अशरफ बदर यांच्याकडे एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन आली. डॉक्टरांनी त्या महिलेला तपासले. त्यानंतर त्या महिलेल्या लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये अशरफ यांनी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. पीडित महिला ही घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्येच चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करते. ‘अनेक दिवसांपासून मला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे मी २३ जुलै रोजी डॉक्टर अशरफ यांच्याकडे गेले. त्यावेळी मी त्यांना पोटात गॅस झाल्याने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांनी मला औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) दिले. जेव्हा मी ती चिठ्ठी घेऊन औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेले तेव्हा अशरफ यांनी त्या चिठ्ठीमध्ये कंडोम असं लिहिल्याचं मेडिकलमधील व्यक्तीने मला सांगितले’ अशी माहिती या महिलेने दिली होती. घडलेल्या प्रकारानंतर या महिलेने रुग्णालय व्यवस्थापनाकडे डॉक्टर अशरफ यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

नक्की वाचा >> पोटदुखीवर डॉक्टरनं दिलं कंडोमचं औषध!; झारखंड विधानसभेमध्ये गोंधळ

डॉक्टरांनी अशी केली होती सारवासारव…

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॉक्टर अशरफ यांनी नक्की ही माहिला कधी आली होती याबद्दल आपल्याला आठवत नसल्याचे म्हटलं होतं. तसेच या महिलेऐवजी तिचा मुलगा किंवा सून माझ्याकडे तपासणीसाठी आले असतील आणि त्यांना मी प्रिस्किप्शनवर कंडोम लिहून दिले असेल अशी शक्यता अशरफ यांनी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 11:02 am

Web Title: doctor ashraf badar dismissed for recommending condom for stomach complaint in ghatshila scsg 91
Next Stories
1 युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही : इम्रान खान
2 दिल्ली : चार मजली इमारत कोसळून एक ठार ; आणखी काही जण अडकल्याची भिती
3 ‘चांद्रयान-२’मधून लँडर यशस्वीपणे विलग!
Just Now!
X