News Flash

धक्कादायक! शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर रुग्णाच्या पोटात विसरले कैची

शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. निझाम इन्स्टिटयूट ऑफ मेडीकल सायन्स रुग्णालयात एका महिला रुग्णावर हर्णियाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया

शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. हैदराबादच्या निझाम इन्स्टिटयूट ऑफ मेडीकल सायन्स रुग्णालयात एका महिला रुग्णावर हर्णियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिये दरम्यान वापरलेली कैची डॉक्टरांनी तशीच त्या महिलेच्या पोटात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

एक नोव्हेंबर रोजी महेश्वरी चौधरी (३३) यांच्यावर रुग्णालयात हर्णियाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला. १२ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण ७ फेब्रुवारीला रात्री पोटात प्रचंड वेदना होत असल्याने त्या पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी एक्स रे रिपोर्टमध्ये त्यांच्या पोटात कैची आढळून आली.

ही कैची काढण्यासाठी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या निष्काळजीपणाच्या चौकशीसाठी रुग्णालयाने समिती स्थापन केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी आरएमओकडे तक्रार नोंदवली. आपली चूक असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासन तो एक्स रे रिपोर्ट देत नव्हते पण आम्ही तो मिळवला असे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 6:17 pm

Web Title: doctor leaves scissors in patients stomach during surgery
Next Stories
1 विषारी दारुमुळे दोन राज्यात आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू
2 टि्वटरचे CEO आणि अधिकाऱ्यांचा संसदीय समितीसमोर हजर होण्यास नकार
3 सीबीआयकडून कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी
Just Now!
X