News Flash

मेडिकल चेकअपसाठी गेलेल्या महिलेवर डॉक्टरकडून बलात्कार, व्हिडीओ काढून करत होता ब्लॅकमेल

गेल्या वर्षभरापासून हा डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार करत होता

प्रतिकात्मक छायाचित्र

महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून हा डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार करत होता. मुझफ्फरनगर मधील मिरनपूर येथील ही घटना आहे. साजीद हसन असं या डॉक्टरचं नाव आहे.

आरोपी डॉक्टरने महिलेवर बलात्कार करत असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं. नंतर याच व्हिडीओचा वापर करत पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यात येत होतं. गेल्या वर्षभरापासून महिलेवर बलात्कार करण्यात येत होता अशी माहिती मिरनपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली आहे. पीडित महिला कैथोरा गावाची रहिवासी आहे.

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वर्षभरापुर्वी मेडिकल चेकअपसाठी आपण हसन याच्या दवाखान्यात गेलो असता त्याने आपल्यावर बलात्कार केला होता. बलात्काराचं कृत्य त्याने मोबाइलमध्ये कैद केलं होतं. कोणालाही याबद्दल सांगितलं तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करेन अशी धमकी तो वारंवार देत होता. अखेर पोलिसांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 11:08 am

Web Title: doctor raped woman by blackmailing her
Next Stories
1 समस्या सांगणाऱ्या पत्रकाराला पियुष गोयल यांची एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर
2 North Korea : जाणून घ्या हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया नेमका आहे तरी कसा
3 Rahul Gandhi in bhiwandi court: राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; कोर्टाला छावणीचं रुप
Just Now!
X