News Flash

डॉक्टर पत्नीच नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ पाहायला भाग पाडायची आणि तिच्याच मोबाइलमध्ये….

पॉर्न व्हिडीओची सवय आणि सोशल मीडियाचे व्यसन यामुळे अनेकांचे वैवाहिक आयुष्य अडचणीत आले आहे.

पॉर्न व्हिडीओची सवय आणि सोशल मीडियाचे व्यसन यामुळे अनेकांचे वैवाहिक आयुष्य अडचणीत आले आहे. काहींचे संसारही मोडले आहेत. बंगळुरुमध्ये एका ताज्या प्रकरणात महिला डॉक्टरच नवऱ्यावर पॉर्न व्हिडीओ पाहाण्यासाठी सक्ती करत होती. तिच्या या सवयीमुळे आज तिचाच संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. आपला संसार वाचवण्यासाठी या महिला डॉक्टरने आता पोलीस आयुक्त कार्यालयातील समुपदेशन कार्यालयात धाव घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मॅट्रीमोनियल साइटवरुन जुळलं लग्न
महिला डॉक्टर मूळची कोलकात्याची असून, नवरा उत्तर प्रदेशचा आहे. मॅट्रीमोनियल साइटवरुन सर्वप्रथम दोघांची ओळख झाली. २०१८ साली दोघांनी लग्न केलं व पूर्व बंगळुरुमध्ये घर घेऊन संसार थाटला. लग्नाआधी आपले दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते हे महिला डॉक्टरने नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितले होते.

पत्नीच्या मोबाइलमध्ये सापडला तो व्हिडीओ

सुरुवातीला या जोडप्यामध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण महिलेला पॉर्न पाहण्याची सवय होती. नवऱ्याने सुद्धा ते व्हिडीओ पाहावेत, यासाठी ती मागे लागायची. नवऱ्याला ते अजिबात पसंत नव्हते. या दरम्यान तिच्या मोबाइल फोनमध्ये नवऱ्याला तिचा दुसऱ्या पुरुषासोबतचा शरीरसंबंधांचा व्हिडीओ सापडला. नवऱ्याने तिला जाब विचारला. त्यावेळी तिने पूर्वप्रियकर ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवडयात नवऱ्याने पत्नीचा आणखी एक व्हिडीओ ऑनलाइन पाहिला. जेव्हा, नवऱ्याने तिला जाब विचारला तेव्हा तिने लग्नाआधी अनेकांसोबत संबंध असल्याचे कबूल केले. पण व्हिडीओ ऑनलाइन अपलोड करण्यामध्ये काहीही सहभाग नसल्याचा दावा केला. या सर्व प्रकारावर चिडलेल्या नवऱ्याने तिला सोडून दिले व स्वतंत्र रहायला सुरुवात केली.

त्यानंतर महिलेने पोलीस आयुक्त कार्यालयातील परीहार केंद्रात मदतीसाठी धाव घेतली. समुपदेशन केंद्रात दोघांना समोरासमोर बसवल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. नवऱ्याला घटस्फोट हवा आहे तर, पत्नीला लग्न वाचवायचे आहे अशी समुपदेशन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 2:17 pm

Web Title: doctor wife forces techie husband to watch porn he stumbles upon her sex videos dmp 82
Next Stories
1 श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
2 Viral Video: हिटलरच्या मुखात मोदींचे शब्द; कामरा का हमला
3 भारत आता लोकशाही देश राहिलाय का? प्रियंका गांधींचा सवाल
Just Now!
X