दिल्लीच्या रोहिणी भागामध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये दोन मृतदेह सापडले. कारचे इंजिन सुरु असल्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या एका वाटसरुचे लक्ष कारवर गेले. त्याला कारमध्ये रक्ताच्या थारोळयात पडलेले दोन मृतदेह दिसले. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्टरचे रोहिणी भागामध्ये स्वत:चे हॉस्पिटल असून मृत महिला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करायची. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. डॉक्टरने आधी गोळया घालून तिची हत्या केली. नंतर स्वत:चे जीवन संपवले.

पत्नीला घटस्फोट देऊन डॉक्टरने तिच्यासोबत लग्न करावे यासाठी मृत महिला दबाव टाकत होती. अनेक वर्षांपासून एकत्र काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोघांनी लग्नाला जाण्यासाठी म्हणून घर सोडले होते. डॉक्टर आणि महिलेमध्ये असलेल्या प्रेमसंबंधांची दोघांच्या कुटुंबियांना माहिती होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor woman friend found dead in car dmp
First published on: 05-12-2019 at 18:28 IST