दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्ली शहर सोडलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पणजी विमानतळावर येत आता पुढचे काही दिवस ते गोव्यात राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी यांना शहर काही दिवसांसाठी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली होता. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी हे गोव्यात दाखल झाले आहेत. पुढचे काही दिवस या दोघांचाही मुक्काम गोव्यात असणार आहे.

बिहारच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षातही अंतर्गत बंडाळी सुरु झाल्या आहेत. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा अहेर देत, बिहारचा पराभव ही आपल्याला सामान्य बाब वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना सलमान खुर्शीद आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना खडे बोल सुनावले होते. काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळ्या सुरु असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्ली सोडली आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडणार का? की हा अंतर्गत वाद आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.