03 June 2020

News Flash

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक

इंदूर पोलिसांची कारवाई

(संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातील टाटपट्टी बाखल भागात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल सात जणांना अटक करण्यात आली आहे. कोविड-१९च्या एका रुग्णाचे नातेवाईक आणि परिचित यांचे विलगीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या ५ सदस्यांचे एक पथक बुधवारी टाटपट्टी बाखल भागात गेले असता, बेफाम झालेल्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक करत हल्ला केला. यात दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

या व्हिडीओच्या आधारे आम्ही या दगडफेकीत सहभागी असलेल्या ७ जणांची ओळख पटवली आणि त्यांना अटक केली, असे पोलीस उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

करोनाबाबत समाजमाध्यमांवर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे हा हल्ला झाला असावा आणि काही समाजकंटकांनी जमावाला फूस लावली, असे तपासात आढळले. हा हल्ला पूर्वनियोजित नसला, तरी आरोग्य विभागाच्या या मोहिमेविरुद्ध समाजमाध्यमांवर अफवा पसरवण्यात आल्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

समाजमाध्यमांवर अशा अफवा पसरवणाऱ्यांचाही आम्ही शोध घेत असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत, असे पोलीस उपमहानिरीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेले सात जण २१ ते ५० वर्षे वयोगटातील असून, तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:36 am

Web Title: doctors attack arrested abn 97
Next Stories
1 गो करोना, करोना गो! नंतर रामदास आठवलेंची करोनविरोधात ही घोषणा!
2 तबलिगी जमातीशी जोडले गेलेले ९६० परदेशी नागरिक ‘ब्लॅक लिस्टेड’
3 इलॉन मस्क जगभरात मोफत व्हेंटिलेटर्स द्यायला तयार पण एक अट…
Just Now!
X