30 November 2020

News Flash

बापरे! रूग्णाच्या पोटातून बाहेर काढले ८ चमचे, २ टूथब्रश आणि १ चाकू

हा रूग्ण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे

एका रूग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ टूथब्रश आणि स्वयंपाक घरात वापरातला १ चाकू बाहेर काढला आहे. ३५ वर्षीय रूग्णाच्या पोटातून हे सगळं बाहेर काढल्याने डॉक्टरांनी धक्का बसला. हिमाचल प्रदेशातल्या लाल बहादुर शास्त्री सरकारी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. २४ मे रोजी या रूग्णाला या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आम्ही त्याच्या पोटातून चमचे, स्क्रू ड्रायव्हर आणि चाकू बाहेर काढला. या रूग्णाचे नाव काय ते समजू शकलेले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आम्ही या रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. हा रूग्ण मानसिकदृष्ट्या आजारी आहे अशी माहिती रूग्णालयातले डॉक्टर निखिल यांनी दिली. आता या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार दुर्मीळ आहे, मानसिक आजार असल्यामुळेच या रूग्णाने या वस्तू गिळल्या असेही डॉक्टर निखिल यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 8:55 am

Web Title: doctors removed 8 spoons 2 screwdrivers 2 toothbrushes and 1 kitchen knife from the stomach of a 35 year old man in shri lal bahadur shastri government medical college
Next Stories
1 ‘राहुल गांधींचा नकारात्मक प्रचार काँग्रेसला भोवला’
2 विरोधकांनी आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं-शिवसेना
3 मंत्रिपदांवरून चर्चेला जोर!
Just Now!
X