News Flash

केंद्राचा निधी मामाच्या खिशातून येतो काय?

छत्तीसगड सरकारला केंद्राने दिलेल्या निधीचा मुद्दा वारंवार काँग्रेस उपस्थित करते, मात्र हा निधी त्यांच्या मामाच्या खिशातून दिला काय, असा सवाल

| November 15, 2013 02:38 am

छत्तीसगड सरकारला केंद्राने दिलेल्या निधीचा मुद्दा वारंवार काँग्रेस उपस्थित करते, मात्र हा निधी त्यांच्या मामाच्या खिशातून दिला काय, असा सवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना येथील प्रचारसभेत केला.
राहुल यांचा उल्लेख शहजादे असा करत, छत्तीसगडला निधी दिल्याचे वारंवार सांगता. हा निधी तुमच्या मामाच्या खिशातून आला काय, असा सवाल त्यांनी विचारला. काँग्रेस गरिबांची थट्टा उडवत असून रोज २६ रुपये कमावणारा गरीब नाही, असे नियोजन आयोग सांगतो. मात्र तेवढय़ा पैशात केवळ ३०० ग्रॅम कांदे येतात, अशी टीका त्यांनी केली. गरिबांच्या तोंडचा घास काँग्रेस हिरावत असल्याचा आरोप मोदींनी केला. सोनियांनी छत्तीसगड सरकारवर आरोप करण्यापूर्वी जरा गृहपाठ करायला हवा, असा टोलाही लगावला. पंतप्रधानांनी वेळोवेळी छत्तीसगड सरकारचे कौतुक केले. उत्तम प्रशासनाबद्दल बक्षिसेही दिली. मग आता टीका कशी करता, असा सवाल मोदींनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:38 am

Web Title: does central funds belong to your maternal uncle modi to rahul
Next Stories
1 सोनिया गांधींचा नागपूर दौरा रद्द?
2 बसला लागलेल्या आगीत सात मृत्युमुखी, ४० जखमी
3 मोदी यांना भेटण्यास ब्रिटनचे पंतप्रधान उत्सुक
Just Now!
X