26 November 2020

News Flash

शेवटी ती आईच…पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्रा सापाशी भिडली कुत्री

कुत्री कोब्रा सापाचा सामना करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आई काहीही करु शकते…वेळ आली तर स्वत:चा जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचवते. नेमकं हेच एका कुत्रीने सिद्ध केलं असून आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ती चक्क कोब्रा सापासोबत भिडली. कुत्री कोब्रा सापाचा सामना करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमागची गोष्ट भावनिक असून, जेव्हा ती समोर आली तेव्हा अनेकांनी तिच्या धैर्याला सलाम केला.

कोब्रा सापाने आधीच तिच्या दोन पिल्लांना मारुन टाकलं होतं. आता तिच्यासमोर आपल्या इतर पिल्ल्लांना वाचवण्याचं आव्हान होतं. यावेळी पुढचा मागचा कसलाही विचार न करता आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी कुत्री थेट कोब्रा सापासमोर जाऊन उभी राहिली. व्हिडीओत कुत्री वारंवार कोब्रा सापावर भुंकत त्याला पिल्लांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

अत्यंत धोकादायक असणारा कोब्रा कुत्रीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र कुत्रीचं संपूर्ण लक्ष आपल्या पिल्लांना कसं वाचवायचं याच्याकडे लागून राहिलेलं आहे. खूप वेळ दोघांमध्ये ही लढाई सुरु असते.

हा व्हिडीओ ओडिसामधील भद्रक येथील आहे. रात्री वारंवार कुत्री भुंकत असल्याने लोक तिथे जमा झाले होते. आवाज ऐकून सर्वांना कुत्री इतका वेळ का भुंकत आहे याचं कुतुहूल वाटत होतं. जेव्हा लोकांनी जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कुत्री कोब्राशी सामना करत आपल्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं.

मात्र कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. लोकांची गर्दी वाढत चालली होती. अखेर काही जणांनी कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावलं. सर्पमित्राने कोब्राला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. कुत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचं कौतुक केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2018 6:48 pm

Web Title: dog fights with cobra to save puppies video viral
Next Stories
1 Viral Video: नाचणाऱ्या युपी पोलिसांच्या चौकशीचे आदेश, नेटकरी म्हणतात त्यांच काय चुकलं?
2 अन् त्यांनी मुलाचे नाव ठेवले ‘नरेंद्र मोदी’
3 VIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर
Just Now!
X