आर्थिक दैनावस्थेमुळे दिवाळखोरीत चाललेल्या किंगफिशर एअरलाइन्सपुढील अडचणींची मालिका वाढतच चालली आहे. आता या विमान कंपनीचे आंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय उड्डाण परवाने तत्काळ रद्द करण्यात आले असून, ते अन्य भारतीय विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.
किंगफिशरने उड्डाण परवान्यांचा वापर न केल्याने ते काढून घेण्यात आले असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. किंगफिशरकडे आठ देशांमध्ये उड्डाण करण्याचे १२६ परवाने होते. सरकारी यंत्रणा वा विमानतळ अधिकाऱ्यांकडून विमान कंपन्यांना, विशिष्ट काळात उड्डाण करण्यासाठी वा विमानतळावर उतरण्यासाठी हे उड्डाण परवाने दिले जातात.