News Flash

घरगुती गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तेल कंपन्यांचा ग्राहकांना दिलासा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने बुधवारी याची घोषणा केली.

प्रातिनिधीक छायाचित्र

देशभरात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना एक दिलासादायक बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने बुधवारी याची घोषणा केली.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार, दिल्लीत एलपीजी सिलेंडर ६१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे याची किंमत ७४४ रुपये असेल. तर मुंबईत गॅस सिलेंडर ६२ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत ७१४.५० रुपये असेल.

या नव्या दरांनुसार देशातील चार महानगरांमधील दर असे असतील-

  1. दिल्ली – ७४४.०० (नवा दर), ८०५.५० (जुना दर)
  2. कोलकाता – ७७४.५० (नवा दर), ८३९.५० (जुना दर)
  3. मुंबई – ७१४.५० (नवा दर), ७७६.५० (जुना दर)
  4. चेन्नई – ७६१.५० (नवा दर), ८२६.०० (जुना दर)

दरम्यान, देशातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ३० मार्च रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये जर करोनामुळे सिलेंडर घरोघरी पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांचे मदत देण्याची घोषणा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 5:22 pm

Web Title: domestic gas cylinder becomes cheaper reassure consumers of oil companies aau 85
Next Stories
1 Coronavirus: …म्हणून एकाचवेळी गावकऱ्यांनी केलं मुंडन
2 करोना रुग्णांची काळजी घेताना मृत्यू झाल्यास १ कोटी देणार, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
3 कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरला करोनाची लागण, संपूर्ण रुग्णालय बंद करण्याची वेळ
Just Now!
X