News Flash

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आरोपी महिलेवरही खटला!

कौटुंबिक हिंसाचार कायद्याची व्याप्ती वाढविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

| October 10, 2016 02:02 am

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आरोपी महिलेवरही खटला!
अपंगांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यात सर्वोच्च न्यायालयाने सूट दिली आहे. (संग्रहित छायाचित्र)

कौटुंबिक हिंसाचार कायद्याची व्याप्ती वाढविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ हे शब्द काढून टाकून पीडित महिलेने हिंसाचाराचा आरोप केलेल्या कुटुंबातील इतर महिला आणि मुलांवरही खटला चालविण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे.

कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ च्या कलम २ मध्ये ‘प्रौढ पुरुष’ या शब्दांचा उल्लेख आहे. त्यानुसार कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी म्हणून ‘प्रौढ पुरुष’ या शब्दांचा वापर करण्यात येतो. मात्र, हे शब्द या कायद्याच्या हेतूशी तर्कसंगत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि न्यायाधीश आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने हे शब्दच कायद्यातून काढून टाकण्याचा आदेश दिला. मात्र, या कायद्यातील इतर शब्द कायम राहणार असल्याचे न्यायालयाने  ५६ पानी निकालपत्रात स्पष्ट केले.

या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ या उल्लेखाचा शब्दश: अर्थ लावून मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दोन मुली, एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाची सुटका केली होती. हे चारही आरोपी ‘प्रौढ पुरुष’ या संज्ञेत मोडत नसल्याचे नमूद करत  हा निर्णय दिला होता. या निर्णयाला पीडित महिलेने आव्हान दिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 2:02 am

Web Title: domestic violence case in supreme court
Next Stories
1 सरकारवर टीका? खबरदार!
2 मोनिका घुर्डे हत्याप्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक
3 अध्यक्षीय शर्यतीतून माघारीस ट्रम्प यांचा नकार
Just Now!
X