पिझ्झा म्हटले की त्यासोबत कोकाकोला हे समीकरण काही नवे नाही. पिझ्झासारख्या पदार्थासोबत कोकाकोलााच आस्वाद घेणे अनेकांना आवडते. परंतु पिझ्झा आणि कोकचे हे अनोखे नाते आता तुटणार आहे. भारतात डॉमिनोज या फूडचेनसोबत मागील २० वर्षांपासून असलेले कोकचे नाते आता तुटणार आहे. याचे कारण म्हणजे डॉमिनोज चालवणाऱ्या जुबलियंट या कंपनीने कोकशी असणारा करार रद्द करायचे ठरवले असून येत्या काळात कंपनी पेप्सीशी करार करणार असल्याचे बोलले जात आहे. भारतात डॉमिनोजचे ११४४ स्टोअर्स आहेत. याठिकाणी ग्राहकांना पिझ्झासोबत कोक देण्यात येते. मात्र आता या दोन पदार्थांचे नाते तुटणार आहे.

डॉमिनोजची फूड चेन जगभरात ८५ देशांमध्ये उपलब्ध आहे. मिशिगन याठिकाणी कंपनीचे हेडक्वार्टर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि मलेशिया हे देश सोडून संपूर्ण जगभरात कोकाकोला आणि डॉमिनोजची पार्टनरशिप आहे. याबरोबरच मॅकडोनल्डसोबतही कोकचा करार आहे. तर पिझ्झा हट, केएफसी आणि टाको बेल यांच्याबरोबर पेप्सीचा करार आहे. यामागचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही २० वर्षांपासून या दोन कंपन्यांमध्ये असलेले नाते आता संपुष्टात येण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे आता तुम्ही डॉमिनोजमध्ये पिझ्झा खाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोकऐवजी पेप्सीवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.