19 January 2021

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेल अ‍ॅमी डोरिसचा आरोप

१९९७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर माजी मॉडेलने एक धक्कादायक आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप अ‍ॅमी डोरिसने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २० वर्षांपूर्वी माझं लैंगिक शोषण केलं असा आरोप या मॉडेलने केला आहे.

‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅमी डोरिसने हा खळबळजनक आरोप केला आहे. ५ सप्टेंबर १९९७ रोजी US ओपन टेनिस स्पर्धा होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिआयपी बॉक्समधील बाथरुममध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप अ‍ॅमी डोरिसने केला आहे. अ‍ॅमी डोरिसने म्हटलं आहे की “त्यावेळी मी २४ वर्षांची होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी माझा लैंगिक छळ केला. मी तिथून सुटून, पळूनही जाऊ शकत नव्हते. मी डोनाल्ड ट्रम्पना मागे ढकलत होते. त्यांचा प्रतिकारही करत होते. मात्र त्यांनी तरीही माझा लैंगिक छळ आणि शोषण केलंच. हा अनुभव माझ्यासाठी भयंकर होता. या घटनेनंतर माझ्या मनात अत्यंत विचित्र भावना येत होत्या. खूपच वाईट वाटत होते” असंही अ‍ॅमी डोरिसने सांगितलं आहे. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अ‍ॅमी डोरिस सध्या फ्लोरिडात वास्तव्य करते. तिने ‘द गार्डियन’ला यूएस ओपन स्पर्धेचे त्या वर्षातले तिकिट तसंच काही फोटोही दिले आहेत. अ‍ॅमी डोरिसने २०१६ मध्येच या सगळ्या गोष्टींना वाचा फोडायची असे ठरवले होते. मात्र कदाचित आपण बोललो तर आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होऊ शकतो असे तिला वाटल्याने तेव्हा ती शांत राहिली.

अ‍ॅमी डोरिसने आणखी काय सांगितले

“मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत खूप दिवस होते. त्यावेळी मी न्यू यॉर्कमध्ये आले होते. जॅसन बिन हा माझा बॉयफ्रेंडही माझ्यासोबत आला होता. त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीसोबत फ्लोरिडात वास्तव्य करत होते. तसंच मिमामी मध्ये मॉडेलिंगसाठीही जायचे” अशीही माहिती अ‍ॅमी डोरिसने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 8:19 pm

Web Title: donald trump accused of sexual assault by former model amy dorris scj 81
टॅग Donald Trump
Next Stories
1 ‘ग्रेटर नेपाळ’च्या नावाखाली नैनीताल, देहरादूनवरही नेपाळ सांगतोय हक्क
2 सुशांतची हत्या की आत्महत्या? पुढच्या आठवड्यात कळणार नेमकं कारण
3 मोदींनी केलेल्या २४३ विक्रमांची नोंद असणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ पुस्तकाचे प्रकाशन
Just Now!
X