Donald Trump India tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदीतून ट्विट करत उत्तर दिलं आहे. ‘भारत तुमच्या येण्याची वाट पाहत आहे. तुमच्या भेटीमुळे दोन्ही देशातील मैत्री आणखी घट्ट होईल. अहमदाबादमध्ये लवकरच भेटू’ असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. मोदी यांच्या या ट्विटला ट्रम्प यांनी हिंदीतून उत्तर दिलं आहे. ‘भारतात येण्यास उत्सुक आहे. सध्या वाटेत आहे. काही तासांतच सगळ्यांना भेटू.’ असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.

ट्रम्प यांचं ट्विट –

मोदी यांचं ट्विट –

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज, सोमवारपासून ३६ तासांच्या भारतभेटीवर येत आहेत. भेटीच्या पहिल्या दिवशी, २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण करतील. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया याही येत आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे  रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.