22 October 2020

News Flash

चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचा कर लादण्याची ट्रम्प यांची घोषणा

व्यापार युद्धाचा दोन्ही देशांत भडका

व्यापार युद्धाचा दोन्ही देशांत भडका

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचा कर लादला असून त्यामुळे बडय़ा अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांतील व्यापार युद्ध शिगेला जाणार आहे. चीनने या आयातशुल्कवाढीचा बदला घेण्याचे सूतोवाच लगेचच केले आहे. अमेरिकी व्यापार प्रतिनिधी याबाबतची अधिकृत घोषणा आज करणार आहेत. त्यासाठी काही आठवडय़ातच संघराज्य सरकारकडून अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यावर चीन गप्प बसणार नाही, हे उघड असून अमेरिकी वस्तूंवर चीनमध्ये कर लादले जाणार आहेत.

ट्रम्प यांनी व्यापारमंत्री विल्बर रॉस व अर्थमंत्री स्टीव्हन नुशिन तसेच व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायटीझर यांच्याशी नव्वद मिनिटे चर्चा केल्यानंतर आयात शुल्कात जबर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने लगेचच याचा सूड घेत अमेरिकी वस्तूंवर कर लादण्याचे सूचित केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले, की अमेरिकेने एकतर्फी उपाययोजना केल्या असून त्यामुळे आता चीनचे हित धोक्यात येणार आहे. आता आम्हीही आमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर चौकटीत राहून कृती केल्याशिवाय राहणार नाही. चीनने असे म्हटले आहे, की अमेरिकेने ५० अब्ज डॉलर्सचे कर चिनी वस्तूंवर लादले असले, तरी अमेरिकी विमाने, मोटारी व सोयाबीन यांच्यावर ५० अब्ज डॉलर्सचे शुल्क लादण्यात येईल. मार्चमध्ये ट्रम्प यांनी असे सांगितले होते, की चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचा व्यापारी दंड लागू केला जाईल. त्यानंतर चीनने सूड घेण्याचा इशारा देतानाच ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर आणखी ५० अब्ज डॉलर्सचे शुल्क लादण्याची धमकी दिली होती. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्य रोझा डेलारो यांनी म्हटले आहे, की आयात शुल्क वाढवणे हा अमेरिकेसाठी चीनला रोखण्याच्या अनेक साधनांपैकी एक उपाय आहे. व्यापारात समतोल राखण्यासाठी चीनला वाटाघाटीसाठी भाग पाडले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 1:38 am

Web Title: donald trump chinese goods tax
Next Stories
1 एमबीबीएस प्रवेशासाठी अंध विद्यार्थ्यांची याचिका
2 सुवर्ण महोत्सवी वर्षांतच ‘निर्लेप’ची मालकी बजाजकडे!
3 काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावावर सैन्याचा गोळीबार; तरुणाचा मृत्यू, महिला जखमी
Just Now!
X