बराक ओबामा यांच्या नावाची नोंद इतिहासात सर्वात अपात्र व वाईट अध्यक्ष अशी होईल, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ओबामा हे अमेरिकी इतिहासात भयानक अध्यक्ष म्हणून नोंदले जातील असे ते म्हणाले.
सिनक्लेअर ब्रॉडकास्ट ग्रुपला त्यांनी मुलाखत देताना सांगितले, की ते इतिहासात एक वाईट अध्यक्ष म्हणून ओळखले जातील. मध्यपूर्व, सीरिया व इतरत्र काय घडले ते बघा, त्यामुळेच मीजिंकण्याची त्या पक्षाला भीती वाटत आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना सांगितले, की पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी सैनिक हुमायून खान इराकमध्ये २००४ या वर्षी आत्मघाती हल्ल्यात मारला गेला. त्याच्या आईवडिलांवर टीका केली त्याबाबत मला अजिबात खेद वाटत नाही. या मुद्दय़ावरून माझ्यावर बरीच टीका झाली. हिलरी क्लिंटन यांना भुताळी संबोधल्याबद्दलही मला खंत वाटत नाही असे सांगून ते म्हणाले, की त्या फसवणूक करणाऱ्या आहेत. खोटे बोलतात. आगामी निवडणुकीत गैरप्रकार केले जातील ही भीती वाटते. गेल्या काही वर्षांत बऱ्याच गोष्टी घडल्या. प्राथमिक फेऱ्यातही त्यांनी गैरप्रकार केले, त्यामुळे बर्नी सँडर्स यांना उमेदवारी मिळणार नाही ही भीती वाटत होती. अमेरिकेतील अब्जाधीश वॉरेन बफेट यांनी ट्रम्प यांना त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र जाहीर करण्याचे आव्हान दिले होते ते त्यांनी स्वीकारले नाही. वॉरेन बफेट मला माहीत नाहीत व त्यांना कधी भेटलेलो नाही. कोरियातील अमेरिकी सैन्य कमी करू. आशियातील व इतरत्रच्या मित्र देशांनी सैन्य ठेवायचे असेल तर पैसे द्यावेत. चाळीस वर्षांपूर्वी जिमी कार्टर अध्यक्ष असताना त्यांनी दक्षिण कोरियातून सैन्य मागे घेण्याचे ठरवले होते, पण त्यांना ते जमले नाही. अमेरिकेचा संरक्षण खर्च मला कमी करायचा आहे. दक्षिण कोरियात मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 4, 2016 1:48 am