मागच्याच आठवड्यात भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ज्यानंतर शुभेच्छा देणारा एक ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मात्र त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले. दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जैन, बौद्ध, शिख समुदायाचा उल्लेख केला मात्र हिंदू शब्द लिहायचे विसरले. त्यावरून अनेक नेटकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केले.

हिंदूंमध्ये दिवाळी साजरी केली जाते हे तुम्ही विसरलात का? असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला. तर दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे पण हरकत नाही शिख, बौद्ध आणि जैन हे देखील आमचे बांधवच आहेत असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले आणि त्यात हिंदूंनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.