News Flash

औद्योगिक देश शिखर परिषद जी-७ रशियाचा पुन्हा समावेश हवा

औद्योगिक देशांच्या आघाडीच्या गटामध्ये रशियाचा पुन्हा समावेश झाला

उत्तर कोरियाचे किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या हॉरवर्ड एक्स आणि डेनिस आलन यांनी सिंगापूर येथील मेर्लिऑन पार्कमध्ये पर्यटकांचे शुक्रवारी लक्ष वेधून घेतले.

औद्योगिक देशांच्या आघाडीच्या गटामध्ये रशियाचा पुन्हा समावेश झाला पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवडाअखेर होणाऱ्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेपूर्वी म्हटले आहे.

जी-७ देशांच्या शिखर परिषद बैठकीमध्ये रशियाचा सहभाग हवा, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून शिखर परिषदेला रवाना होताना वार्ताहरांना सांगितले. कॅनडातील शार्लेव्हॉइक्स येथे परिषद सुरू असून रशियाला तेथे परवानगी दिली पाहिजे, कारण चर्चेसाठी आम्हाला रशिया हवा आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या गटाला २०१४ मध्ये जी-८ देश म्हटले जात होते, मात्र क्रिमिया खालसा केल्याने बहुसंख्य सदस्य देश रशियाविरुद्ध एकत्र आले आणि रशियाला या गटातून निलंबित करण्यात आले. ट्रम्प यांच्याशी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्याशी ट्विटरयुद्ध उडाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:11 am

Web Title: donald trump g7 summit
Next Stories
1 ‘..तरच किम यांना व्हाइट हाऊसचे निमंत्रण’
2 बँकेत तरुणाने मागितले नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख, नकार दिल्यावर जाळून घेण्याचा प्रयत्न
3 निवृत्ती वेतन मिळावे म्हणून नाग घेऊन कार्यालयात धडकले आजोबा!
Just Now!
X