Donald Trump Kim Jong Un summit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली असून उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे. हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम यांनी अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळली. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई यांनी उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळली.

सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली.

LIVE UPDATES Of Donald Trump Kim Jong Un summit in Singapore:

07:10AM: किम जोंग उन आणि माझ्यात मैत्रीपूर्ण संबंध असतील, शिखर परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी ट्रम्प यांचा आशावाद, तर किम जोंग उन म्हणाले, असंख्य अडथळे पार करुन आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो.

06:43 AM: डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी हस्तांदोलन करत बैठकीला सुरुवात केली.

06:37 AM: दोन्ही नेत्यांचे हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी.

06:36 AM: ऐतिहासिक दिवस…. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग उन यांची भेट

06:34 AM: ट्रम्प- किम जोंग भेटीपूर्वीचे छायाचित्र

06:30AM: डोनाल्ड ट्रम्प – किम जोंग यांचे सेनटोसा बेटावर आगमन.

06:27AM: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ असेल.

06:25AM: काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प- किम जोंग उन यांच्यात ऐतिहासिक भेट

06:20AM: अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आले आहेत.

06:09 AM: उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीतील फलनिष्पत्ती चांगलीच असेल, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केला होता. 

06:07 AM: अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आले आहेत.

06:05 AM: ऐतिहासिक शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी तीन हजार पत्रकार जमले आहेत. त्यांच्यासाठी खास भारतीय खाद्यपदार्थाची व्यवस्था करण्यात आली असून त्यात पुलाव व चिकन कुर्मासह इतर देशांच्या ४५ डिशेसचा समावेश आहे.