भारतीय कॉल सेंटरमधील लोक बोलताना जे उच्चार करतात त्यांची अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्कल केली, त्याचवेळी त्यांनी भारत हा एक महान देश आहे असे सांगत मी भारतीय नेत्यांवर रागावलेलो नाही हे सांगतानाच पुन्हा एकदा भारत व इतर देशांना अमेरिकेतील नोक ऱ्या हिसकावू देणार नाही, हे पालुपद कायम ठेवले.
न्यूयॉर्कमधील स्थावर मालमत्ता व्यवसायातील अब्जाधीश असलेले ट्रम्प यांनी सांगितले की, मी एकदा क्रेडिट कार्ड कंपनीला फोन केला होता, त्यामागील हेतू त्यांचा ग्राहक माहिती सेवा विभाग भारतात आहे की परदेशात हे पाहण्याचा होता.
आता यात वेगळे सांगायला नको ते भारतीय कॉल सेंटर होते, मी फोन करून क्रेडिट कार्डची माहिती विचारली तेव्हा त्या व्यक्तीलाच तुम्ही कुठून बोलता आहात असे विचारले. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतीय लोक कसे चुकीचे उच्चार करतात याची नक्कल करून दाखवली.
भारत हा महान देश आहे, भारतातील नेत्यांवर मी नाराज नाही तर आमच्या देशातील नेते बेवकूफ आहेत. मी चीनवर रागावलेलो नाही, जपान, व्हिएतनाम व भारतावर रागावलेलो नाही. डेलावर येथे अमेरिकेतील क्रेडिट कार्ड कंपन्यांचे केंद्रच आहे. बँक ऑफ अमेरिका, सिटीबँक, डेलावर, एम अँड टी बँक, पीएनसी फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस ग्रुप यांच्या सेवा तेथे आहेत. भारत, जपान, चीन, व्हिएतनाम, मेक्सिको या देशांना फायदा होईल अशी धोरणे चालवता येणार नाहीत. अमेरिकेतून उद्योग बाहेर जात आहेत, मुलाच्या हातातून कँडी हिसकावण्यासारखेच हे आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार हिरावले जात आहेत. आमच्या नोक ऱ्या हिसकावल्या जात आहेत. प्रत्येक आघाडीवर आम्ही हरत चाललो आहोत. काही चांगले चाललेले नाही. आमचा देश आता यापुढे जेत्याच्या रूपात असणार नाही. कारखाने बंद होत आहेत. आम्ही हे यापुढे होऊ देणार नाही. डेलावरमध्ये माझ्या ३७८ कंपन्या आहेत, तेथे करसवलती आहेत हे चांगले आहे. ओबामा हे दहशतवादा विरोधात इस्लामी मूलतत्त्ववादी हा शब्द वापरायला तयार नाहीत. हिलरी क्लिंटनसारख्या बदमाश महिलेविरोधात लढायला मला आवडेल, त्यांना कुणी दिली नसेल अशी मात देऊ.
कॅरोलिनसाच्या भारतीय अमेरिकी गव्हर्नर निक्ली हॅले यांच्यावरही त्यांनी टीका केली, कारण प्रायमरीत त्यांनी ट्रम्प यांना संमती दिली नव्हती.