News Flash

आम्हाला मदत करा ! करोनाविरुद्ध लढ्यात ट्रम्पची मोदींना विनंती

शनिवारी संध्याकाळी ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चा

आम्हाला मदत करा ! करोनाविरुद्ध लढ्यात ट्रम्पची मोदींना विनंती

सध्या संपूर्ण जगभरात करोना विषाणूने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. इटली, स्पेन, अमेरिका, चीन यासारखे आर्थिक विकसीत देशही या विषाणूमुळे हैराण झाले आहेत. अमेरिकेत प्रत्येक दिवशी करोना विषाणूमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची मदार आता भारतावर असणार आहे. शनिवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत करोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली आहे. अमेरिकेत सध्या ३ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

करोनामुळे जिवीतहानी झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्येही नागरिकांना या विषाणूचा फटका बसला आहे. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये याकरता प्रशासन रात्रीच्या वेळी मृतदेह बाहेर काढत आहे. भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरलं होतं. भारतात आजही अनेक लोकांना मलेरिया हा आजर होत असतो, यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करत असतात. हेच औषध सध्याच्या घडीला करोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे, हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. हे औषध अमेरिकेलाही उपलब्ध व्हावं यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र कच्च्या मालाच्या अभावापोटी भारतातही या औषधाचं उत्पादन कमी झालेलं आहे. सध्या जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे भारतातील औषध कंपन्यांनी या औषधासाठीचा कच्चा मालक एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्याशी बातचीत केली. यावेळी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासक बोलसोनारो यांनी दिलं. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्मितीसाठी भारत चीन आणि ब्राझील या दोन देशांकडून बहुतांश कच्चा माल आयात करतो. करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या जगभरातील वैद्यकीय यंत्रणा कसोशीने काम करत आहेत, त्यामुळे या लढ्याला कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:23 pm

Web Title: donald trump requests pm narendra modi to release hydroxychloroquine ordered by us psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’; पाकिस्तानने केली भारतीयांची प्रशंसा
2 आश्चर्य घडलं! गंगेच्या पाण्याची गुणवत्ता पन्नास टक्क्यानं सुधरली
3 Coronavirus : प्रिन्स चार्ल्स आयुर्वेदीक औषधांमुळे झाले बरे? जाणून घ्या सत्य..
Just Now!
X