08 July 2020

News Flash

भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत

गेल्या तीन वर्षांत ट्रम्प आणि मोदी यांच्यात व्यक्तिगत मैत्री झाली आहे

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ व २५ फेब्रुवारीला भारतात येत असून त्यांनी या दौऱ्याबाबत आशावादी असल्याचे सांगून दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील असे सूचित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत असून ते गुजरातमधील अहमदाबाद येथे थांबणार आहेत. मोदी व ट्रम्प यांची संयुक्त सभा (मेळावा)  तेथील स्टेडियमवर होणार आहे.

ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात वार्ताहरांना सांगितले की,‘ मोदी हे सभ्यगृहस्थ आहेत, भारत दौऱ्याकडे आपण आशावादी दृष्टिकोनातून पाहात आहोत. महिनाअखेरीस हा दौरा होणार आहे.’ व्हाइट हाऊ सने त्यांच्या दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो व्यापार करार योग्य असेल तरच मान्य केला जाईल. भारत काहीतरी करू इच्छित आहे, त्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत जर योग्य असा व्यापार करार होणार असेल तर त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.’

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी सांगितले की, ‘ट्रम्प व मोदी यांच्यात व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यातूनच ट्रम्प यांची भारतभेट घडून येत आहे. अमेरिकेला भारताबरोबरचे संबंध एका नव्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे हे यातून सूचित होते आहे.’

गेल्या तीन वर्षांत ट्रम्प आणि मोदी यांच्यात व्यक्तिगत मैत्री झाली आहे. २०१९ मध्ये दोन्ही नेत्यांची चारदा भेट झाली होती. ूस्टन येथे पन्नास हजार भारतीय अमेरिकींसमवेत दोन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली होती तो मेळावा ‘हाऊ डी मोदी’ नावाने गाजला होता. आता तशाच प्रकारचा मेळावा अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या स्वागतार्थ होणार आहे. यावर्षी मोदी व ट्रम्प यांचे दोनदा फोनवर बोलणे झाले. ट्रम्प यांनी मंगळवारी असे सांगितले की, ‘आपण नुकतेच फोनवर मोदी यांच्याशी संभाषण केले आहे.’

भारत दौऱ्याबाबत उत्सुकता आहे असे सांगून ते म्हणाले की, ‘अहमदाबाद येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला असून त्यावेळी हजारो भारतीय तुमचे स्वागत करणार आहेत अशी माहिती दूरध्वनी संभाषणावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला दिली.’

‘अहमदाबाद येथील कार्यक्रमाला लाखो लोक तुमच्या स्वागतासाठी येतील असे मोदी यांनी आपल्याला सांगितले आहे, त्या तुलनेत काल रात्री मी ४०—५० हजार लोकांपुढे भाषण केले ती गर्दी किरकोळ ठरेल. त्यामुळे आता यापुढे अशी किरकोळ गर्दी मला कमीच वाटणार आहे. विमानतळ ते अहमदाबादचे स्टेडियम या मार्गावर ५० ते ७० लाख लोक स्वागताला येणार आहेत. ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. मोदी यांनी ते अलीकडेच बांधून घेतले आहे. ते जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तेथे हा कार्यक्रम होणार आहे,’अशी माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांना दिली.

मेलबर्नपेक्षा मोठे स्टेडियम : दोन्ही नेत्यांची संयुक्त भाषणे अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममधील महामेळाव्यात होणार आहेत. हे स्टेडियम बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च आला असून तेथे सव्वा लाख  लोक एकाचवेळी बसू शकतात. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पेक्षा हे मोठे स्टेडियम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 4:20 am

Web Title: donald trump shows willingness to sign trade deal with india zws 70
Next Stories
1 डायमंड प्रिन्सेस जहाजावर १७४ रुग्ण
2 आठ तासाला चारशे रुग्ण; डॉक्टर आणि परिचर थकले
3 पुदुच्चेरी विधानसभेत सीएएच्या विरोधात ठराव पारित
Just Now!
X