News Flash

टर्नबुल यांच्याशी संभाषण सुरू असताना दूरध्वनी खंडित

‘निर्वासितांबाबतचा करार सर्वात वाईट’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

स्थलांतरितांच्या प्रश्नावरून ट्रम्प संतप्त; ‘निर्वासितांबाबतचा करार सर्वात वाईट’

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाशी केलेल्या निर्वासितांबाबतच्या करारावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यावर तोंडसुख घेतल्याचे वृत्त आहे. टर्नबुल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करताना या मुद्दय़ावरून ट्रम्प यांनी मध्येच दूरध्वनी खंडित केल्याची बाब आता उघडकीस आली आहे.

स्थलांतरितांच्या मुद्दय़ावरून ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाशी एका सामंजस्य करार केला होता. ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश देण्याचे ओबामा यांनी मान्य केले होते. ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना टर्नबुल यांनी त्यांना या कराराचे स्मरण करून दिले. ते ऐकताच ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी हा सर्वात वाईट करार असल्याचे सांगितले.

बोस्टनवर हल्ला करणाऱ्यांना अमेरिकेत पाठविण्याचा आपला विचार आहे का, असा सवाल ट्रम्प यांनी टर्नबुल यांना केला आणि संभाषण सुरू असताना मध्येच दूरध्वनी खंडित केला, असे उघडकीस आले आहे. या कराराचा आपण अभ्यास करणार असल्याचे ट्रम्प यांनी त्यानंतर जाहीर केले.

‘मुस्लीम प्रवेशावरील र्निबध हटवा’

मुस्लीमबहुल सात देशांमधील नागरिकांना देशांत प्रवेश देण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेले र्निबध मागे घेण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अ‍ॅण्टोनिओ ग्युटर्स यांनी केले आहे. अमेरिकेचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचा हा उत्तम मार्ग नाही, उलटपक्षी त्यामुळे चिंता आणि संताप पसरेल, असे ग्युटर्स यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:28 am

Web Title: donald trump slams malcolm turnbull as worst call ever
Next Stories
1 लिची फळामुळे मुझफ्फरपूरमध्ये मेंदूचा घातक रोग
2 मुस्लीम प्रवेशावरील र्निबध उठविण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे ट्रम्प यांना आवाहन
3 बुरखा परिधान करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा ‘एनवायपीडी’त छळ
Just Now!
X