News Flash

बायडेन किंवा ट्रम्प; अमेरिकेसोबतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही : परराष्ट्र सचिव

भारताला कायमच अमेरिकेचं समर्थन, परराष्ट्र सचिवांची माहिती

फाइल फोटो

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध इतके दृढ आहेत की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणीही विराजमान झालं तरी त्याचा संबंधांवर परिणाम होणार नाही, असं मत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी बुधवारी व्यक्त केलं. “जिकडे अमेरिका आणि भारताची गोष्ट आहे, दोन्ही देशांतील संबंध दृढ आहेत. याला आम्ही जागतिक भागीदारी म्हणतो. अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य आहे. तिथे कोणत्याही पक्षाचं सरकार असो भारताला अमेरिकेचं सततच समर्थन मिळत आलं आहे. यापुढेही असंच राहिल, असा आम्हाला विश्वास आहे,” असं श्रृंगला म्हणाले.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला हे सध्या युरोपच्या दौफ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिका आणि भारत संबंधांवर आपली प्रतिक्रिया दिली. यादरम्यान त्यांना युरोपमधील हल्ल्याच्या घटनांबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “संकटकाळात आम्ही पूर्णपणे युरोपसोबतच आहोत. दहशतवाद आणि वर्णभेदाविरोधात आपल्याला एकत्रित काम करावं लागेल,” असंही ते म्हणाले.

“काही संघटना, काही देश या हल्ल्यांचं समर्थन करतात. आम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं वक्तव्य पाहिलं. अल्पसंख्यांकांसोबत कसं वागावं हे आपल्याला पश्चिमेकडील देशांना शिकवावं लागेल असं ते म्हणाले. हे वक्तव्य त्या देशाकडून आलंय ज्या देशानं आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना पद्धतशीररित्या दूर केलं,” असंही ते म्हणाले.

सार्वभौमत्वाशी तडजोड नाही

यावेळी त्यांनी चीनच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “भारत सार्वभौमत्वाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. सीमेवर एकाच बाजूनं परिस्थिती बदलण्याच्या सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींमुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. सीमेबाबत दोन्ही देशांची धारणा एकसारखी नाही. तरीही तुम्ही त्यात बदल करू इच्छिता. याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होतो,” असं श्रृंगला म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 11:23 am

Web Title: donald trump wins or joe biden indo american relation will not affected harsh shrigla foreign secretary us election 2020 jud 87
Next Stories
1 महाराष्ट्रात आणीबाणी २.०; भाजपा नेत्यानं महाराष्ट्र सदनाबाहेर लावलं उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचं पोस्टर
2 US Election 2020 : न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर यापूर्वी दोन वेळा बदललाय निवडणुकीचा निकाल
3 करुन दाखवलं! बायडेन यांनी मतांच्याबाबतीत ट्रम्पच काय ओबामांचाही विक्रम मोडला
Just Now!
X