14 August 2020

News Flash

आमच्यावर आरोप करु नका, आधी स्वत:चं घर संभाळा, भाजपाचं अशोक गेहलोत यांना प्रत्युत्तर

राजस्थानात राजकीय उलथापालथ

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायलट. (संग्रहित छायाचित्र)

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार कोसळू शकते, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपाच्या दोन नेत्यांना अटक झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘सत्ताधारी काँग्रेसने विरोधी पक्षावर आरोप करण्याआधी आपले घर संभाळावे’, असे भाजपाने म्हटले आहे.

“काँग्रेसने भाजपावर आरोप करु नये, त्याऐवजी त्यांनी आपले घर संभाळावे” असे भाजपा नेते ओम माथुर यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेवर आल्यापासूनच अशोक गेहलोत सरकार अडचणीत आहे असे माथुर म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. हे सत्य स्वीकारण्याऐवाजी गेहलोत भाजपाला जबाबदार ठरवत आहेत” असे माथुर यांनी सांगितले.

सचिन पायलट यांनी अहमद पटेलांची घेतली भेट
राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार समजले जातात.

सचिन पायलट यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेहलोत यांच्याबद्दलचा तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका सूत्रांने सांगितले. सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची सुद्धा भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:47 pm

Web Title: dont blame us get your house in order bjp tells rajasthan cm ashok gehlot dmp 82
Next Stories
1 सचिन पायलट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात; १९ आमदारांच्या पाठिंब्याचा केला दावा
2 ‘आमच्यातील वाद विकोपाला’; अहमद पटेलांच्यासमोर सचिन पायलट यांनी सोडलं मौन
3 गर्लफ्रेण्डने बोलणं बंद केलं; विद्यार्थ्याने पाच पानांची चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
Just Now!
X