भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांची संक्रातीच्या दिवशी घेतलेली भेट आणि त्यांच्याबद्दल स्तुतीसुमने उधळल्याबद्दल ‘एमआयएम’ संस्थेने सलमानवर पलटवार केला आहे.
नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक करणाऱया सलमान खानचे चित्रपट पाहू नका फतवा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने (एमआयएम) काढला आहे.
“सलमान हा फक्त मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती आहे. त्याच्या बाबतील लोकांनी वेगळा विचार करायला हवा. मैंने प्यार कियाच्या ऐवजी मैने प्यार क्यों किया असे आता लोकांनी सलमानला म्हणायला हवे” अशी थेट वैयक्तीक टीका ‘एमआयएम’चे नेते ओवेसी यांनी केली आहे. तसेच “सलमान नाव आहे म्हणून कुणी मोठे होत नाही. चित्रपटातील त्याचा थिल्लरपणा बघण्याची काही गरज नाही. सर्वांनी त्याच्या जय हो चित्रपटावर बहिष्कार टाकावा” असेही ओवेसी म्हणाले.