पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

दहशतवाद हा जागतिक शांततेला धोका आहे. त्याला भौगोलिक सीमा नाहीत. त्यामुळे दहशतवादाशी लढण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगतानाच धर्म आणि दहशतवाद यांची सांगड घालणे चुकीचे असल्याचे ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले.
आसिआन परिषदेच्या निमित्ताने येथे आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधताना दहशतवादाच्या वाढत्या थैमानाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘इंटरनेट हे दहशतवाद्यांसाठी भरती केंद्र बनू नये याची दक्षता घ्यायला हवी. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जग एकत्र येऊ पाहात आहे. दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो, अशा प्रवृत्तींना टाळणे गरजेचे आहे. धर्म आणि दहशतवाद यांची सांगड घालणे चुकीचेच आहे.’