News Flash

बलात्कार पीडित लहान मुलांचे कशाही स्वरुपातील फोटो दाखवू नये: सुप्रीम कोर्ट

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना विशेष दर्जा देणारा आणि राज्यातील स्थायी नागरिकत्वाची व्याख्या सांगणारे घटनेतील कलम ३५ अ विरोधात दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (संग्रहित छायाचित्र)

बिहारमधील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी माध्यमांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. माध्यमांनी बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये, तसेच चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी बिहार बंदची हाक देण्यात आली असून सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वत:हून गुरुवारी दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. बिहार सरकारने यासंदर्भात तपास अहवाल कोर्टात सादर करावा, असे कोर्टाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनाही निर्देश दिले आहेत. बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र (मॉर्फ केलेले आणि चेहरा ब्लर केलेले सुद्धा) वापरु नये, असे कोर्टाने सांगितले. तसंच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:19 pm

Web Title: dont publish blurred images of rape victims supreme court muzaffarpur shelter sexual abuse
Next Stories
1 कलबुर्गींप्रमाणेच गौरी लंकेश यांच्या डोक्यात गोळ्या घालण्याचे दिले होते आदेश
2 सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले: राहुल गांधी
3 हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची
Just Now!
X