पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी; शांतता प्रक्रियेत अडथळे न आणण्याचा सल्ला
भारताबरोबर आम्ही शांतता बोलणीची प्रक्रिया सुरू केली आहे आता कुणी भारतविरोधी विधाने करून ती हाणून पाडू नये, अशी तंबी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याचे समजते.
शरीफ यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताविरोधात आगाऊपणे वक्तव्ये करून शांतता प्रक्रियेत अडथळे आणू नयेत. भूतकाळ विसरून शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन देणारी विधाने त्यांनी करावीत. पंतप्रधांनी त्यांचे सहकारी व मंत्री यांना भारताशी शांतता प्रक्रिया आता बिघडवलीत तर याद राखा असा अप्रत्यक्ष दम दिला आहे असे द नेशन या वृत्तपत्राची बातमी आहे.
शरीफ हे आताच्या शांतता प्रक्रियेबाबत आशावादी आहेत, त्यांना भारताशी संबंध सुधारण्याची आशा आहे त्यामुळे संपूर्ण भागाचाच फायदा होईल असे त्यांना वाटते. भारताला पाकव्याप्त काश्मीरबाबत चर्चा करायची आहे असे विधान भारतीय नेत्यांनी केले होते त्यामुळे शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती पण ते भारताचे अधिकृत धोरण नाही हे नंतर त्यांना समजून चुकले. शरीफ हे भारताबरोबरच्या चच्रेत काश्मीर, दहशतवाद व व्यापार या गोष्टींना महत्त्व देतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या एका अधिकाऱ्यांच्या मते शरीफ व लष्करी नेतृत्व यांच्या भूमिकेत भारताच्या संदर्भात फार फरक झालेला नाही. त्यांच्या मतांमध्ये काही फरक पडलेला नाही त्यांनी वरकरणी भारताचे म्हणणे मान्य केले असले तरी प्रमुख मुद्दय़ांवर त्यांच्या भूमिका बदललेल्या नाहीत.
पॅरिस येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्यातील चर्चा व त्यानंतर बँकॉक येथे सुरक्षा सल्लागारांमध्ये झालेली चर्चा यामुळे द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हार्ट ऑफ पीस या परिषदेच्या निमित्ताने यांनी अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांनी त्यावेळी पंतप्रधान शरीफ व पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांच्याशीही चर्चा केली होती. शरीफ व मोदी यांची जानेवारीत पुन्हा स्वित्र्झलड येथे भेट होत असून दोन्ही नेते जागतिक आíथक मंचाच्या परिषदेसाठी दावोस-क्लोस्टर्स येथे २० जानेवारीला ते एकत्र येत आहेत. भारताचे मावळचे उच्चायुक्त टीसीए राघवन यांनी गुरूवारी सांगितले की, दोन देश चांगल्या सहकार्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पाकिस्तान व भारत यांच्यात र्सवकष संवादाची तयारी सुरू झाली ही चांगली बाब आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.