दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. गुरुवारी दुपारी अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
#आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या माजी हंगामी उद्घोषक आणि #सह्याद्री वाहिनीच्या माजी #वृत्तनिवेदिका #मालविका #मराठे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या मेंदूच्या कर्करोगानं आजारी होत्या.@airnewsalerts
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 7, 2020
मालविका यांनी सुरुवातीला आकाशवाणीत हंगामी उद्घोषक म्हणून काम केले. त्यानंतर त्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘हॅलो सखी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जवळपास १२ वर्षे सूत्रसंचालन करत होत्या. या कार्यक्रमामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 8:47 pm