पॅरिस : ‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द  यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन  झाले. दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख  ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.  पॅरिसमध्ये वृद्धापकाळामुळे ऑलिव्हिया यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.