समाजसुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतातील प्रसिद्ध समाजसेवक आणि सुधारणावादी नेते अच्युत सामंत यांना बाहरीन राजवटीने ‘इसा’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, सुवर्णपदक आणि १० लाख डॉलरची रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून सामंत यांना ३ जून रोजी बाहरीनचे राजे हमीद बिन इसा अल् खलिफा यांच्या हस्ते एका विशेष समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. बाहरीनचे पंतप्रधान राजपुत्र खलिफा बिन सलमान अल् खलिफा, आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रा. सामंत यांनी केलेल्या कार्यामुळे आशिक्षितपणा, भुकेची समस्या, गरिबी यांचे उच्चाटन होण्यास मदतच होणार असल्याचे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे.