देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस तयार करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रशियानं करोनावरील लसीची घोषणा केली होती. तसंच ती भारतालाही पुरवण्याची तयारी रशियानं दाखवली होती. दरम्यान, ही लस देशात कधी उपलब्ध होणार याबाबत आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव यांनी माहिती दिली आहे.

इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी किरील दिमित्रीव आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालकर जी.व्ही.प्रसाद यांच्याशी चर्चा केली. “कंपनीनं रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. लवकरात लवकर ही लस भारतीय बाजारात उपलब्ध केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात ही लस उपलब्ध करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कंपनी यासाठी अनेक प्रयत्न करत असून सकारात्मक संकेतही मिळाले आहे. कमीतकमी वेळात करोनाची लस लोकांसाठी उपलब्ध व्हावी अशी आमची इच्छा आहे,” असं मत डॉ. रेड्डीजचे व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही.प्रसाद यांनी व्यक्त केलं.

“रशियन लसीच्या चाचणीसाठी आम्हाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी काही महिन्यांचा वेळ लागू शकतो. त्यांनी (रशिया) सर्वात प्रथम लस तयार केली आहे. या प्रकारे आणखीही अनेक प्रयत्न करण्यात आले,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारताची भूमिका महत्त्वाची

आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की या करोना महामारीच्या लढाईत भारतीच भूमिका महत्त्वाची असणार आहे. मेक इन इंडियानं भारतातील फार्मा क्षेत्राला बळकट केलं आहे. रशियातील लसीबाबत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच विश्वासार्हतेचाही प्रश्न उपस्थित केला आहे,” असं किरील दिमित्रीव म्हणाले. पश्चिमेकडील देश विरोधी प्रचार करत आहेत. पश्चिमी देशांच्या लसीची चाचणी झाली नाही. ते सतत टीका करत आहे. ही लस ही सुरक्षित आणि अत्याधुनिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

अनेक दशकं संशोधन

“आमच्याकडे लसीचे ४ कोर्स आहेत. ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळू शकतात. त्याला मान्यता देणं हे नियामक मंडळाच्या हाती आहे. लोकांना लस घएता येईल. नोव्हेंबरनंतर ४० हजारांपेक्षा अधिक लोकांना लस देता येईल. आम्ही या लसीवर अनेक दशकं संशोधन केलं आहे. अमेरिकनं लष्कर जेव्हापासून विषाणूचा वापर करत आहे तेव्हापासून आम्ही या लसीची चाचणी करत आहोत. नियामक मंडळाच्या मान्यतेनंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही लस भारतात येण्याची शक्यता आहे.”