18 March 2019

News Flash

मोदी आणि इमॅन्युअल यांच्या बॅनर्समागे लपवल्या ड्रेनेज लाईन्स, फोटो झाले व्हायरल

पाहुण्यांसमोर अशाप्रकारे लाज वाचवावी लागते

अशाप्रकारे गंगेच्या काठावर लावण्यात आलेले बॅनर्स

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन पत्नी ब्रीगीट यांच्यासोबत सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल यांनी वाराणसीमध्ये बोटीमधून गंगा घाटावर फेरफटका मारला. मोदी आणि इमॅऩ्युअल बोटी सफरीचा आनंद घेत असतानाच किनाऱ्यावर वेगवेगळे संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता परदेशी राष्ट्रपतींसमोर उभारण्यात आलेल्या खोट्या गंगा घाटाचे चित्र नेटकऱ्यांनी समोर आणले आहे. सध्या हे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

कालच्या इमॅन्युअल यांच्या गंगा भेटीनंतरचे काही फोटो ट्विटवर तसेच इतर समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून यामध्ये स्थानिक प्रशासनाची चालाखी दाखवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी गंगेच्या पात्रात वाहून आणणाऱ्या मोठ्या नाल्यांसमोर तसेच पाईपलाईन्ससमोर चक्क मोदी आणि इमॅन्युअल यांचे पोस्टर उभे करण्यात आले आहेत. अनेक नेटकरी हे फोटो शेअर करत असून गंगा स्वच्छता अभियानासाठी एका स्वतंत्र मंत्रालयायची स्थापना करुन काही हजार कोटींची तरतूद करुन पाहुण्यांसमोर अशाप्रकारे लाज वाचवावी लागत असल्याबद्दल नेटकऱ्यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. या बरोबरच या भेटीदरम्यान सजावटीसाठी वापरण्यात आलेली फुले आणि इतर टाकाऊ वस्तू नंतर गंगेच्या पात्रातच सोडून देण्यात आल्याचे काही व्हिडीओही समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आले असून हाच का स्वच्छ भारत असा उपरोधक सवालही अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे.

 

First Published on March 13, 2018 5:52 pm

Web Title: drainage lines were hidden behind french president emmanuel macron pm modis banners during their ganga ride in varanasi