News Flash

दिलासा! पुढील आठवड्यात ‘DRDO’चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ होणार लाँच

पुढील आठवड्यात मिळतील १०,००० डोस

करोना विषाणूची दुसरी लाट देशात विनाश करत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची देखील कमतरता जाणवत आहे. लसीकरणात भर टाकण्यासाठी स्फुटनिक लस पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे करोना रुग्णांना बराच दिलासा मिळू शकेल. डीआरडीओने विकसित केलेले अँटी-कोविड औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) चे १०,००० डोस पुढील आठवड्यात बाजारात येणार आहेत.

संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, करोना औषध ‘२ डीजी’च्या १०,००० डोसची पहिली तुकडी पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल. हे औषध करोना रूग्ण त्वरीत बरे करते आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. डीआरडीओच्या उत्पादकांनी अशी माहिती दिली की, औषध उत्पादक भविष्यात या औषधाचे उत्पादन वेगाने करण्यासाठी काम करीत आहेत.

२-डीजी औषध अशा वेळी मंजूर झाले आहे जेव्हा भारत करोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेने ग्रस्त आहे आणि देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव आहे. हे औषध डीआरडीओच्या पथकाने विकसित केले आहे. संकटाच्या वेळी एक वरदान मानले जाणारे हे औषध तयार करण्यात तीन वैज्ञानिकांचा सहभाग होता. यामध्ये डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे होते. हे औषध एका पॅकेटमध्ये येते, ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर प्यावं लागतं.

या औषधाबद्दल, संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेमुळे मोठ्या संख्येने रूग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णालयात दाखल करण्यात यात आहे. या पार्श्वभूमीवर हे औषध जीव वाचवण्यासाठी बहुमोल असणार आहे. कारण ते संक्रमित पेशींवर कार्य करते. हे कोविड -१९ रूग्णांचा हॉस्पिटलायझेशन कालावधी कमी करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 10:15 am

Web Title: drdo anti covid drug 2 dg will be launched next week srk 94
टॅग : Corona,Coronavirus,Drdo
Next Stories
1 करोना मृत्यूचं वादळ कायम; २४ तासांत चार हजार रुग्णांनी गमावले प्राण
2 आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
3 करोनाचं अरिष्ट! गंगेत वाहून आलेल्या शेकडो मृतदेहांमागील ही आहेत कारणं
Just Now!
X