21 October 2020

News Flash

आज मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात होती खास सिस्टिम, लेझर किरणांनी टार्गेट पाडण्यास सक्षम

भारताने दाखवला एनर्जी वेपनचा प्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी मोदी यांच्या अवती-भवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात होता. मोदी आणि लाल किल्ल्यावर आलेल्या विशेष पाहुण्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन खास सिस्टिम तैनात करण्यात आली होती.

लाल किल्ल्यावर सुरक्षा रक्षकांच्या बरोबरीने ड्रोन विरोधी सिस्टिमही सज्ज होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ही अत्याधुनिक सिस्टिम विकसित केली आहे. ही अँटी ड्रोन सिस्टिम तीन किलोमीटरच्या परिघातील मायक्रो ड्रोन्स शोधून त्यांना जॅम करते. ही सिस्टिम अडीच किलोमीटरपर्यंतच्या परिघातील लक्ष्य लेझर किरणांद्वारे पाडण्यास सक्षम आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी ज्या लाल किल्ल्यावरुन भाषण केले, तिथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सरकारच्या यशस्वी योजना आणि भविष्याचा आराखडा मोदींनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणातून मांडला. साधे कपडे आणि गणवेश दोघांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात होते. उपस्थितांवर लक्ष ठेवण्यासाठी चेहऱ्यावरुन ओळख पटवणारी सिस्टिमही महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शकतत्वांचे पालन करण्यात आले.

पोलिसांच्या बरोबरीने एनएसजी कमांडो, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) आणि इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (आयटीबीपी) चे जवान सुरक्षेसाठी तैनात होते. ३०० पेक्षा जास्त कॅमेरे बसवण्यात आले होते. ज्यामध्ये प्रत्येक हालचाल टिपली जात होती. लाल किल्ला परिसरात ४ हजार सुरक्षारक्षक तैनात होते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 1:35 pm

Web Title: drdos anti drone system guarded red fort had laser to bring down targets dmp 82
Next Stories
1 आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पाऊल; अमेरिकेसह पाच राष्ट्रांना भारतानं पुरवल्या २३ लाख पीपीई किट
2 चीनमधील शांडोंग येथे बैरूतप्रमाणे मोठा स्फोट; अनेक घरांची छतंही उडाली
3 अमेरिकेचा टिकटॉकला मोठा झटका; ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे बाईटडान्सला आदेश
Just Now!
X