News Flash

धक्कादायक! बाइक स्टंट करण्यास विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलांनी २८ वेळा तरुणाला भोसकलं आणि त्यानंतर…

भररस्त्यावर तरुणाची हत्या होत असताना लोक मात्र पाहत राहिले

बाइक स्टंट करण्यास विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलाने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणाने आरोपीला दिल्लीमधील रघुबीर नगर परिसरात बाइक स्टंट करण्यास विरोध केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने पीडित तरुणावर तब्बल २८ वेळा चाकून वार केले. पीडित तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्याच्यावर चाकूने वार करत होता.

मनिष असं या पीडित तरुणाचं नाव आहे. मनिष रघुबीर नगरचा रहिवासी असून खासगी कारचालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमध्ये सहभागी सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. ८ जुलै रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत आरोपी मनिषला रस्त्यावर ओढत असून नंतर चाकूने वार करुन हत्या करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यावेळी मुख्य आरोपी असणारा तरुण मनिषच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर चाकूने वार करत होता. महत्त्वाचं म्हणजे यावेळी रस्त्यावर गर्दी होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे न येता तेथून पळून गेले.

इतकंच नाही तर आरोपींना पळ काढल्यानंतरही काहीजण मृतदेहाकडे पाहून तसंच निघून जात होते. पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. मनिषला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुबीर नगर परिसरात वेगाने दुचाकी चालवत स्टंट करायचे. मनिष त्याच परिसरात राहत असल्याने त्याने त्यांचा विरोध केला होता. यामुळेच झालेल्या वादातून आरोपींनी मनिषची इतक्या निर्घृणपणे हत्या केली. मनिषची हत्या करण्यासाठी आरोपींनी आधीच चाकू सोबत ठेवले होते. ८ जुलै रोजी मनिष एकटा असल्याची संधी  साधत त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि हत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 7:23 am

Web Title: driver stabbed 28 times by juveniles for objecting to bike stunts in delhi sgy 87
Next Stories
1 देशात २४ तासांत २८ हजार रुग्ण
2 रेमडेसीवीर, टोसिलिझुमाब औषधांचा वापर प्रमाणातच हवा
3 भारत-चीन लष्करांदरम्यान आज उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी
Just Now!
X