News Flash

सौदीतील तेल वाहिनीवर ड्रोन हल्ले

सौदी अरेबियातून तांबडय़ा समुद्रातून बंदरापर्यंत जाणारी तेल वाहिनी बंद करण्यात आली आहे.

| May 16, 2019 04:25 am

पश्चिम आशियात तणाव

दुबई : सौदी अरेबियातून जाणाऱ्या तेलाच्या वाहिनीवर मंगळवारी ड्रोनहल्ला करण्यात आला असून या आधी पर्शियाच्या आखातात तेलाच्या टँकसर्वर घातपाती हल्ले करण्यात आले होते. या दोन्ही घटनांमुळे परिस्थिती चिघळली असल्याचे सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे. मध्यपूर्वेत यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांनी सांगितले, की आम्ही कुठल्याही संघर्षांच्या विचारात नाही. दरम्यान ब्रेन्ट खनिज तेल दर पिंपाला ७१ डॉलर होते त्यात १ डॉलरपेक्षा अधिक दरवाढ झाली आहे. दरम्यान सौदी अरेबियातून तांबडय़ा समुद्रातून बंदरापर्यंत जाणारी तेल वाहिनी बंद करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री खालीद अल फलिह अल फलिह यांनी सांगितले,की सौदी तेलाचे उत्पादन किंवा निर्यात यात कपात होणार नाही. सौदी अरेबियाशी शत्रुत्व असलेल्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या आस्थापनांवर सात  ड्रोन हल्ले केले. हुथी लष्करी प्रवक्ते  ब्रिगेडियर जनरल याह्य़ा सारी यांनी सांगितले,की आम्ही तेलवाहिनीवरील हल्ल्याची जबाबदारी घेत आहोत. तेलवाहिनीवरील हल्ला हे भ्याड कृत्य असून यात जगाच्या ऊर्जा पुरवठय़ाला व जागतिक अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्यात आले आहे असा आरोप सौदी अरेबियाने केला आहे.

इराणवर ठपका

इराणबरोबरचा २०१५ मधील अणुकरार अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी रद्द केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढत चालला आहे. इराणने म्हटले आहे, की जर तोडगा निघाला नाही तर ७ जुलैपर्यंत आम्ही युरेनियम शुद्धीकरण वेगाने सुरू करणार आहोत. सौदी अरेबियाने ड्रोन हल्ल्याबाबत कुणावर आरोप केलेले नाहीत. मात्र, अल फलिह यांनी येमेनच्या हुथी बंडखोरांचा पाठिंबा असलेल्या गटाचाच यात हात असल्याचे सूचित केले आहे. त्यांना इराणचा पाठिंबा असल्यानेच ते अशी कृत्ये करतात असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 4:25 am

Web Title: drone attacks on saudi arabia oil pipeline
Next Stories
1 ‘चंद्रयान-२’ मोहिमेत १३ पेलोडसह नासाचा प्रयोगही समाविष्ट 
2 कमल हासन यांना कुणाचे प्रोत्साहन?
3 हिंसाचाराच्या ध्वनिचित्रफितींवर नियंत्रणाचा प्रयत्न
Just Now!
X