02 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट, भारतीय संघासमोर मायदेशात अननुभवी वेस्ट इंडिजचे आव्हान आणि अन्य बातम्या

पाच महत्त्वाच्या बातम्या

१. महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांत दुष्काळ ?

अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. राज्यातील १२ जिल्ह्य़ांतील १७० तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला. वाचा सविस्तर>>

२. काश्मीरच्या बाबतीत भारताने चूका केल्या; जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल


जम्मू-काश्मीरमध्ये येत्या ८ ऑक्टोंबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी खळबळजनक विधान केलं आहे. वाचा सविस्तर>>

३. शबरीमला मंदिर प्रकरणी भक्तांच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ नये, RSSचा यू-टर्न


शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही हे प्रकरण अजून संपुष्टात आलेले दिसत नाही. भक्तांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) सर्वोच्च न्यायालयाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे. वाचा सविस्तर>>

४. नातू जन्माचा आग्रह धरल्याने मुलाकडून आईचा खून

लागोपाठ दोन मुली झाल्यानंतर पत्नीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास विरोध करून मुलगा जन्मावा म्हणून आग्रह केल्याने रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे घडली. वाचा सविस्तर>>

५. राजकोटवर राज्य कुणाचे?

परदेशातील मानहानीकारक पराभवानंतर आता भारतीय संघासमोर मायदेशात अननुभवी वेस्ट इंडिजशी सामना करायचा आहे. या मालिकेनंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे खडतर आव्हान समोर असणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सावरण्याचे आणि योग्य सांघिक समन्वय साधण्याचे लक्ष्य असेल. वाचा सविस्तर>>

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 9:05 am

Web Title: drought in marathwada 2018 india vs west indies match updates top five stories
Next Stories
1 काश्मीरच्या बाबतीत भारताने चूका केल्या, जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे खळबळजनक वक्तव्य
2 इंधन दराचा पुन्हा भडका; पेट्रोल १५ पैसे तर डिझेलमध्ये २० पैशांची वाढ
3 जम्मू-काश्मीर: दहशतवाद प्रभावित शोपिया जिल्ह्यात भाजपाचे १३ उमेदवार बिनविरोध
Just Now!
X