करोनाच्या संकटानं आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून, संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी वेगवेगळ्या औषधांची चाचणी केली जात आहे. अशातच रेमडेसिवीर हे औषध करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या औषधाची दहा इंजेक्शन बांगलादेशकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं (सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) या औषधीची अवैधपणे बांगलादेशातून आयात करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या खरेदीला ब्रेक लागला आहे.

आणखी वाचा- कोविडोस्कोप : पुनश्च रेमडेसिवीर !

इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. करोनाचा प्रार्दुभाव वाढत असून, करोनाची लागण झालेल असंख्य रुग्ण गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर या औषधीची बांगलादेशातून आयात करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं (सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) अवैधपणे पुरवण्यात येणारी औषधी रोखण्यात येईल, असं म्हटलं आहे. बांगलादेशातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांना कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे ते कसे आयात करता येईल? असं सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

आणखी वाचा- समजून घ्या, सहजपणे… भारतातील कोविड विरोधी औषधांचा वापर

“सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सध्या भारतातच जेनेरिक औषध उत्पादक कंपन्यांनी बनवलेल्या रेमडेसिवीरच्या गुणवत्तेची चाचणी करीत आहे. त्यामुळे सध्या मान्यता नसलेल्या कंपन्यांकडून रेमडेसिवीर औषधाची आयात रोखण्याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जाणार आहे,” असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

आणखी वाचा- चिंताजनक : देशभरात चोवीस तासांत करोनाचे २००३ बळी, १० हजार ९७४ नवे रुग्ण

या निर्णयामुळे राज्य सरकारच्या खरेदीवर परिणाम…

रेमडेसिवीर हे औषध करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी फायदेशीर असल्याचं सांगत राज्य सरकार रेमडेसिवीरचे १०,००० इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ६ जून रोजी दिली होती. “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असं सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे”, असं टोपे यांनी म्हटलं होतं. मात्र, बांगलादेशातील ज्या रेमडेसिवीर उत्पादन करतात त्यांना मान्यता नसल्याचं सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनं म्हटलं आहे. त्यामुळे बांगलादेशातून या औषधाची आयात करणे हे अवैध ठरणार आहे. या कारणामुळे राज्य सरकारच्या खरेदीचा निर्णय रखडला आहे.