News Flash

करोना उपचारासाठी ‘झायडस कॅडिला’चे औषध प्रभावी

भारतीय औषध नियामकांकडून मंजुरी मिळाल्याचा कंपनीचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

प्रौढांमधील सौम्य स्वरूपाच्या करोना संसर्गावरील उपचारासाठी पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा-२ ब (पेगआयएफएन) या औषधाचा आपत्कालीन वापर करण्याची भारतीय औषध नियामकांकडून आपल्याला मंजुरी मिळाली असल्याचे झायडस कॅडिला या औषध निर्मात्या कंपनीने शुक्रवारी सांगितले.

हेपॅटायटिसच्या उपचारासाठी असलेल्या वरील औषधाच्या अतिरिक्त उपयोगासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांची (डीसीजीआय) मंजुरी मिळण्यासाठी आपण अर्ज केला असल्याचे कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते.

प्रौढांमधील सौम्य स्वरूपाच्या करोना संसर्गावर उपचार करण्यासाठी ‘विराफिन’, पेगआयएफएनचा आपत्कालीन मर्यादित वापर करण्यासाठी आपल्याला औषध महानियंत्रकांची मंजुरी मिळाली आहे, असे झायडस कॅडिलाने सांगितले. गंभीर स्वरूपाच्या हेपॅटायटिस बी व सी रोगाच्या रुग्णांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे औषध सुरक्षित मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:46 am

Web Title: drug zydus cadilla is effective in treating corona abn 97
Next Stories
1 ब्रिटनच्या लशीमुळे करोना होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांनी कमी
2 दिल्लीत प्राणवायूअभावी २५ जण दगावले
3 मे व जून महिन्यांत गरिबांना जादा मोफत धान्य
Just Now!
X